News-Details

डॉ. राजेंद्र गोडे नर्सिंग कॉलेजचा ८५ टक्के निकाल अमरावती विभागात प्रथम

| Date: 2023-02-08


डॉ. राजेंद्र गोडे नर्सिंग महाविद्यालयाची शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे डिसेंबर २०२२ मध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती. त्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून महाविद्यालयाचा निकाल ८५.१०% एवढा लागला आहे. सदर निकालात महाविद्यालय अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर आहे.